भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्...
हर्ड इमुनिटी (Herd Immunity) हा शब्द वैदकीय क्षेत्रासाठी परिचित असला तरी सर्वसामान्य लोकांसाठी हा शब्द ऐकायला मिळाला तो करोना वायरस मूळच. जसा जसा करोना वायरस चीन पासून इतर देशात पसरला तसा तसा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपचार व लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास सर्वच देशांनी Lockdown, Quarantine, Social Distancing अश्या उपायांचा अवलंब केला. पण काही देश असे होते ज्यांनी Herd immunity with infection या वेगळ्या मार्गाचा अवलंब करायचं ठरवलं. त्यातले महत्वाचे दोन देश म्हणजे ब्रिटन आणि स्वीडन. ब्रिटनमध्ये यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तिथल्या सरकारने तो प्लान रद्द केला. पण स्वीडन हा देश Herd Immunity च्याच दिशेन चाललाय. स्वीडन मध्ये कधीच पूर्ण टाळेबंदी करण्यात आलेली नाही.
Herd Immunity नक्की काय आहे??
Herd Immunity या शब्दाचा मराठी अर्थ “कळप प्रतिकारशक्ती” असा होतो. कोणत्याही वायरसच संक्रमण थांबवायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या शरीरामध्ये त्या वायरस विरोधात प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेचं असत. अश्या प्रकारे मोठ्या लोकसमूह मध्ये बनवलेल्या immunity लाच Herd Immunity अस म्हणतात. अशी प्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी गरज असते ती लसीकरणाची (Vaccination). भारतात आपल्या सरकारने अनेक वर्ष Polio लसीकरण मोहीम राबवून ज्याप्रकारे Polio देशातून हद्दपार केला हे “कळप प्रतिकारकशक्ती” निर्माण केल्याच उत्तम उदाहरण आहे.
लस उपलब्ध नसताना Herd Immunity कशी निर्माण करणार?
करोना वायरस वर लस उपलब्ध नाही मग हि कळप प्रतिकारकशक्ती कशी तयार करणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. याच उत्तर दडलय आपल्या शरीरात. आपल्या शरीराकडे नैसर्गिकरीत्या प्रतिकारक क्षमता असते. हि प्रतिकारक संस्था आपल्या शरीरात शिरलेल्या कोणत्याही नवीन वायरस ला ओळखून त्या वायरस विरोधात Antibodies तयार करायचं काम करत असते. याच Antibodies वायरसवर एखाद्या सैनिकाप्रमाणे तुटून पडतात आणि त्याला संपवायचं काम करतात. ज्याची प्रतिकारक शक्ती जास्त त्याच्या शरीरात जास्त Antibodies बनतात आणि तो रुग्ण लवकर बरा होतो. करोना वायरस मध्येही त्यामुळच काही रुग्ण लवकर बरे होत आहेत. काही उशिरा बरे होत आहेत तर काही मृत्युमुखी पडत आहेत. या Antibodies त्या व्यक्तीच्या शरीरात टिकून राहतात आणि त्याला पुन्हा त्या वायरसची लागण होण्यापासून वाचवतात. पण करोना वायरसच्या Antibodies किती काळ टिकून राहतात याची ठोस माहिती उपलब्ध नाही. कमीत कमी ६ महिने टिकून राहतील असा expert च म्हणन आहे.
Herd immunity बनविण्यासाठी नेमक किती लोकांना संक्रमण झाल पाहिजे??
कोणत्याही वायरस विरोधात Herd immunity बनवायची असेल तर एकूण लोकसंख्येच्या काही टक्के लोकांमध्ये या Antibodies तयार झाल्या पाहिजेत. हि टक्केवारी वायरस च्या Reproduction number वर अवलंबून असते. एक रुग्ण इतर किती व्यक्तींना तो वायरस संक्रमित करू शकतो याला Reproduction Number म्हणतात. Reproduction Number जेवढा जास्त तेवढा जास्त टक्के लोकांमध्ये प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेचं आहे. तरच करोना ची साखळी तोडता येऊ शकते. उदाहरणार्थ गोवर या आजाराचा Reproduction Number हा १२-१८ आहे. त्यासाठी एकूण लोकसंख्येच्या ९०-९५% लोकांमध्ये प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेच असत. सुदैवाने आत्ता कोविड-१९ चा Reproduction Number हा कमी म्हणजेच १.५-३.५ आहे. यासाठी ६०% पेक्षा जास्त लोकांमध्ये प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेचं आहे. पण हि टक्केवारी प्राथमिक संशोधनाच्या आधारावर तयार केलीली आहे.
सकारात्मक मुद्दे -
१) लस तयार होण्यासाठी १ वर्षापेक्षा जास्त काळ लागू शकतो अस WHO कडून स्पष्ट करण्यात आल आहे. कोणताही देश इतक्या दिवसांसाठी lockdown करू शकत नाही. लस लवकर उपलब्ध झाली नाही किंवा परिणामकारक लस निर्माणच झाली नाही तर नैसर्गिकरीत्या कळप प्रतिकारक क्षमता बनविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. “प्रभावी औषध” हा पण एक पर्याय ठरू शकतो. पण औषध घेऊन करोना पूर्णपणे बरा होऊ शकेल याची खात्री नाही.
२) जो देश कळप प्रतिकारक क्षमता बनवू शकेल त्या देशात करोनाची दुसरी लाट (second wave) येण्याची शक्यता फार कमी राहील.
३) जास्त धोका असणाऱ्या लोकांसाठीच (लहान मुल, आजारी लोक, वृद्ध) फक्त lockdown करून नियंत्रित पद्धतीने Herd Immunity बनवता आली तर देशाची अर्थव्यवस्था हि टिकून राहील आणि लोकांचे प्राण हि वाचतील.
नकारात्मक मुद्दे-
१) कळप प्रतिकारक क्षमता बनविण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे दर्जेदार आरोग्य व्यवस्था. ज्या देशांकडे चांगली आरोग्य व्यवस्था नाही त्या देशांना हे शक्य नाही.
२) घनदाट लोकसंख्या असलेले देश उदाहरणार्थ भारत, ब्राझील, बांगलादेश, पाकिस्तान. या देशांमध्ये lockdown असूनदेखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. सामाजिक अंतर हे अशक्य आहे. अश्या देशामध्ये Herd Immunity प्रयोग केला गेला तर रुग्नवाढ झपाटयाने होईल. मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढेल. सर्व व्यवस्था कोलमडून पडेल.
३) अश्या प्रकारे बनलेली प्रतिकारकशक्ती किती काळ टिकून राहील याबद्दलही एकमत नाही.
भारतात Herd Immunity यशस्वी होऊ शकते का?
भारतात तरुण लोकसंख्या जास्त आहे. आणि भारतातील मृत्युदर जगाच्या तुलनेत निम्मा आहे (३%). म्हणूनच भारतात नियंत्रित पद्धतीने म्हणजेच जास्त धोका असलेल्या लोकांसाठी टाळेबंदी ठेवून कळप प्रतिकारक शक्ती बनवण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो असा तज्ञांच मत आहे. पण भारतात असा ठराविक लोकांसाठी टाळेबंदी लागू करण सोप्प नाही. तसेच आपली आरोग्य व्यवस्था तेवढी सक्षम नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर लोक मृत्युमुखी पडतील. म्हणूनच भारतात Herd immunity यशस्वी होणार नाही असा हि एक मतप्रवाह आहे.

मग योग्य पर्याय काय?
प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये लस उपलब्ध नसताना नैसर्गिकरीत्या कळप प्रतिकारकशक्ती निर्माण करणे हे धोकादायक आहे. कमी लोकसंख्या आणि चांगली आरोग्य व्यवस्था असणार्या देशात याचा प्रयोग होऊ शकतो. पण अशी प्रतिकारकशक्ती किती काळ टिकेल हे अनुउत्तरीतच आहे. यामध्ये मृत्यू होण्याच प्रमाणही वाढू शकते. स्वीडन मध्ये करोना वायरसचा मृत्यू दर हा १०% पेक्षा जास्त आहे. जो इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. अश्या प्रयोगाला लोकांचा हि विरोध राहील. संक्रमनाच्या आधारे “कळप प्रतिकारकशक्ती” निर्माण करणे हा करोना वायरस वरील शेवटचा पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो पण सध्याच्या परीस्थितीत तरी Quarantine आणि Social Distancing आणि Treatment हेच सर्वोत्तम पर्याय आहेत. लोकांनीही सरकारी नियमांचं पालन करून सहकार्य करणे गरजेच आहे. तरच करोना नियंत्रणात राहू शकतो. अन्यथा सर्वांनाच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Post a Comment