Skip to main content

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्...

करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क किती प्रभावी आहे??

करोना वायरसच्या आधीचं मानवी जीवन आणि नंतरच मानवी जीवन यात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे चेहऱ्यावरच्या मास्कचा. जपान हा देश सोडला तर नेहमी चेहऱ्यावर मास्क घालून फिरणारे लोक इतरत्र कोणत्याही देशात दिसत नाहीत. जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरलात तर लोक विचित्र नजरेने पाहतात. मास्क हा तिथल्या संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. पण करोनाच्या प्रसारानंतर सर्वच देशांनी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. भारतातही मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अश्या वेळी करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा आणि मास्क किती प्रभावी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.

                                           फोटो सौजन्यJuraj Verga
मास्क कोणकोणत्या प्रकारचे असतात?
१) श्वसन मास्क (Respirators)-
श्वसन मास्क मध्ये तीन प्रकारचे मास्क येतात- 1) N९५, 2) N९९, ३) N१००
 प्रमाणित असलेला N95 मास्क हवेतील ९५% कण ज्यांचा व्यास (diameter) १०० ते ३०० nanometer असतो फिल्टर करू शकतो. करोना विषाणूचा व्यास (diameter) हा १०० ते १५० nanometer च्या दरम्यान आहे. N९९ मास्कमध्ये हवेतील ९९% कण फिल्टर करण्याची क्षमता असते. तर N१०० हा ९९.७% कण फिल्टर करू शकतो. हे मास्क राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थांनी ठरवून दिलेल्या नियम आणि प्रक्रियेनुसार बनतात. श्वसन मास्क हे खासकरून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी या लोकांसाठी बनवले जातात. ठराविक कालावधी नंतर या मास्कची टेस्टिंग केली जाते कि ते मास्क योग्य काम करत आहे का नाही. करोना वायरस च्या काळात सर्वच देशामध्ये या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. सामान्य निरोगी माणसाला हे मास्क वापरण्याची गरज नसते.

२) सर्जिकल मास्क- सर्जिकल मास्क अनेक प्रकारात उपलब्ध असतात. सामान्यतः दवाखान्यामध्ये डॉक्टर्स हेच मास्क वापरतात. या मास्कची फिल्टर कॅपासिटी हि १०% पासून ते ९०% पर्यंत असते. करोना वायरस सारख्या लहान वायरस पासून हे मास्क १००% संरक्षण करू शकत नाहित. श्वसन मास्क चा तुटवडा असल्यामुळे थेट रुग्णाच्या संपर्कात नसलेले लोक हे मास्क वापरू शकतात. काहीच नसण्यापेक्षा नाक आणि तोंड झाकण्यासाठी काहीतरी असण कधीही चांगलच.


३)    कापडी मास्क- कापडी मास्क हे करोना पासून पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही. पण इतर वैद्यकीय मास्कचा तुटवडा असल्यामूळ डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी सोडून सर्वसामान्य लोक घरी बनवलेले कापडी मास्क वापरू शकतात. भारताच्या पंतप्रधानांनी देखील लोकांनी कापडी मास्क चा वापर करा अस आवाहन केलेलं आहे. जेणेकरून वैद्यकीय मास्क दवाखान्यासाठी शिल्लक राहतील. करोना वायरस चे विषाणू हे हवेत जास्त काळ राहत नाहीत. याउलट पृष्ठभागावर ते जास्त काळ सक्रीय राहतात. दोन ते तीन आवरण (layers) असलेले आणि चेहर्याला व्यवस्थित चिकटून असलेले कापडी मास्क हे जास्त प्रभावी ठरतात.


मास्क करोनापासून कस संरक्षण करतो?
करोना वायरस नाक आणि तोंडावाटे एका व्यक्ती पासून दुसर्या व्यक्तीकडे संक्रमित होतो असा आजपर्यंतच संशोधन आहे. बहुतांश करोना रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. किंवा लक्षणे दिसण्यासाठी ७ ते १४ दिवसांचा हि कालावधी लागतो. तसेच जगातील ८०% संक्रमण हे अश्या लक्षणे न दिसलेल्या रुग्णांकडूनच झालेला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या कोणत्या व्यक्तीला करोना चा संसर्ग झालेला आहे आणि कोणत्या व्यक्तीला झालेला नाही हे करोनाच्या टेस्ट शिवाय कोणीही सांगू शकत नाही. जर एखादा मास्क न घातलेला निरोगी व्यक्ती करोना रुग्णाच्या संपर्कात आला तर त्याला करोना होण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीत मास्क च आपल संरक्षण करू शकतो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरण अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती कळत नकळत दिवसातून अनेक वेळा आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करत असतो. अश्या वेळी एखादा व्यक्तीच्या हातावर जरी करोना विषाणू असेल तरी हातावाटे शरीरात प्रवेश करू शकतो आणि करोना होऊ शकतो. मास्क घातलेला असेल तर आपोआपच हाताचा चेहऱ्याच्या कोणत्याही भागाला स्पर्श होणार नाही. आणि करोना पासून बचाव होईल.

कापडी मास्क करोना पासून संरक्षण करू शकतो का?
काही लोकांचा प्रश्न आहे कि मास्क असेल तर social distancing कशाला आणि social distancing असेल तर मास्क कशाला? प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 100% social distancing यशस्वी होऊ शकत नाही. आणि फक्त कापडी मास्क वापरूनही करोना पासून पूर्णपणे संरक्षण होऊ शकत नाही. त्यासाठीच मास्क बरोबर social distancing आणि नियमित हात धुणे हि तितकच महत्वाच आहे.

घरगुती कापडी मास्क कसे बनवाल?
CDC (Centre for Diesese control) या अमेरिकन आरोग्यसंस्थेनुसार घरगुती बनवलेलं मास्क हे चांगल्या गुणवत्तेच्या १००% कॉटन फब्रिक पासून बनवलेल असाव. मास्क कॉटन कापडाच्या एकापेक्षा जास्त आवरणापासून (layers) बनवलेलं असाव. अश्या प्रकारच्या मास्क वापरामुळे श्वास घेताना नेहमी सारख मोकळेपणा वाटणार नाही. पण श्वास घेताना जास्तच त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मास्क वापरताना कोणती काळजी घ्याल?
१) प्रत्येक वेळी मास्क लावताना व काढताना हात साबण, Handwash, किंवा Sanitizer ने स्वच्छ धुवावेत.
२) कानात अडकवलेल्या पट्टीला धरूनच मास्क चा वापर करावा. मास्क च्या समोरच्या बाजूस हात लावणे टाळा.
३) चेहऱ्यावर लावलेल्या मास्कला हात लावणे टाळा.
४) मास्कने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकलेल असायला हव.
५) प्रत्येक वापरानंतर मास्क डीटरजंट चा वापर करून धुवावे. पुन्हा तेच मास्क वापरायचे असेल तर दोन दिवस ते उन्हात वाळवून मगच वापरावे.

Social distancing आणि Hand Wash याबरोबरच मास्क हा करोना वायरस प्रसार रोखण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे. घरगुती बनवलेले कापडी मास्क इतर मास्क पेक्षा कमी प्रभावी असले तरी काहीच न घालण्यापेक्षा कापडी मास्क वापरून करोनाच संक्रमण कमी केल जाऊ शकत. आरोग्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती मास्क बनवून वापरला तर तो जास्त प्रभावी ठरेल.

Comments

Popular posts from this blog

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्...

रेपो रेट (Repo rate) आणि रिवर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) म्हणजे काय?

RBI म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडिया हि भारतातील सर्व बँकाची प्रधान बँक आहे. RBI शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. RBI ची स्थापना हि १ एप्रिल १९३५ साली झाली. RBI च मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. संपूर्ण देशात चलन पुरवठा आणि चलन नियंत्रण करण्याच काम RBI करत असते. RBI ने घालून दिलेल्या नियमांनुसारच देशातील सर्व बँका कामकाज करत असतात. त्याचबरोबर काही दर (रेट) ठरवण्याच कामही रिजर्व बँक करत असते. पत्रकार परिषद घेऊन हे दर जाहीर केले जातात. यापैकीच दोन महत्वाचे रेट आहेत ते म्हणजे रेपो रेट आणि रिवर्स रेपो रेट.  रेपो रेट काय असतो? ज्याप्रमाणे सामान्य लोक बँकांमधून कर्ज काढतात. त्या कर्जावर बँक ठराविक व्याज लावत असते. त्याला आपण त्या बँकेचा व्याजदर म्हणतो. कर्जदाराला काढलेल्या कर्जासह या व्याजाचीही परतफेड करावी लागते. अशाच प्रकारे सर्व बँका या रिजर्व बँकेकडून कर्ज घेत असतात. रिजर्व बँकेकडून घेतलेल्या या कर्जावर रिजर्व बँक काही व्याजदर लावत असते. याच व्याजदराला रेपो रेट अस म्हणतात. जेव्हा रेपो रेट वाढतो त्यावेळी बँकासाठी RBI कडून कर्ज घेण आणखी महाग होत. त्यामुळेच बँकादेखील कर्जावरील ...