Skip to main content

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्...

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे.



काय आहे इंस्टाग्राम रील्स?
इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्राम कॅमेरामध्ये देण्यात आलेला आहे. एकाच वेळी १५ सेकंदाचे अनेक विडीओ बनवून त्याला वेगवेगळे इफेक्ट्स देण्याची सुविधा उपलब्ध आहे. रील्स मध्ये “Use Audio” हा पर्याय देखील आहे जेणेकरून एकाच audio चा वापर करून अनेक युजर्स विडीओ बनवू शकतात.

इंस्टाग्राम रील्स भारतात यशस्वी होईल का?
भारतात टिकटॉक वापरणाऱ्यांची मोठी संख्या पाहूनच फेसबुक कडून रील्स चा ऑप्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंस्टाग्राममध्ये विडीओ बनवण्याचे पहिल्यापासूनच काही पर्याय उपलब्ध आहेत. पण टिकटोक सारखे गाण्यांचा वापर करून कमी वेळाचे विडीओ बनवण्याचा पर्याय रील्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे. रील्स हा ऑप्शन आता प्रायोगिक तत्वावर आहे. (experimental stage). त्याबरोबरच भारतातील अनेक ऐप डेवलपर या प्रकारचे ऐप बनवत आहेत. प्लेस्टोरवर मोठ्या प्रमाणात या ऐपना पसंती मिळत आहे. त्यामुळेच टिक टोक चा युजरबेस आपल्याकडे खेचण्याच मोठ आव्हान रील्स समोर आहे. रील्स वर बनवलेल्या विडीओज मधून युजर्सना पैसे कमावण शक्य आहे का हा देखील एक प्रश्न आहे. तसेच टिकटॉक ला टक्कर देण्यासाठी फेसबुककडून बनवण्यात आलेल Lasso हे ऐप काही दिवसापूर्वी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रील्स हे फिचर किती यशस्वी होईल हे येणारा काळच ठरवेल.

टिकटॉक चे युजर्स इंस्टाग्राम रील्स वर जातील का?
टिकटॉक वर भारतातील ग्रामीण भागातील अनेक लोक विडीओ बनवत होते. असे लोक आधीपासून इंस्टाग्रामवर नाहीत. हे लोक इंस्टाग्राम चा वापर करायला लागले तरच रील्स ला टिकटॉक सारखी लोकप्रियता मिळू शकते. टिकटॉक चा अल्गोरिदम नवीन वापरकर्त्यांना लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवून देण्याच्या दृष्टीने काम करत होता. त्यामुळेच टिकटोक वापरणाऱ्यांची संख्या दिवसें दिवस वाढत गेली. रील्स ला पण असाच काहीसा प्रयत्न करावा लागेल. तरच नवनवीन लोक इंस्टाग्राम रील्स चा वापर करायला लागतील.

इंस्टाग्राम रील्स वर विडीओ कसे बनवाल?

इंस्टाग्राम कॅमेर्‍याच्या तळाशी रील्स हा पर्याय निवडा.

ऑडिओ या ऑप्शन वर क्लिक करा आणि आपल्या रील्ससाठी इन्स्टाग्राम संगीत लायब्ररीमधील गाणे शोधा.

आपण आपला स्वतःचा मूळ आवाज टिकटॉक प्रमाणे रेकॉर्ड करून देखील वापरू शकता.

आपण आपल्या रीलला अजून चांगली आणि इतरांपेक्षा वेगळी बनविण्यासाठी AR effects जोडू शकता आणि आपल्या कोणत्याही क्लिपला हँड्सफ्री रेकॉर्ड करण्यासाठी टाइमर देखील सेट करू शकता.

व्हिडिओ किंवा ऑडिओचा वेग जास्त करणे किंवा कमी करण्याचा एक ऑप्शन देखील दिलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क किती प्रभावी आहे??

करोना वायरसच्या आधीचं मानवी जीवन आणि नंतरच मानवी जीवन यात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे चेहऱ्यावरच्या मास्कचा. जपान हा देश सोडला तर नेहमी चेहऱ्यावर मास्क घालून फिरणारे लोक इतरत्र कोणत्याही देशात दिसत नाहीत. जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरलात तर लोक विचित्र नजरेने पाहतात. मास्क हा तिथल्या संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. पण करोनाच्या प्रसारानंतर सर्वच देशांनी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. भारतातही मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अश्या वेळी करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा आणि मास्क किती प्रभावी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.                                            फोटो सौजन्य -  Juraj Verga मास्क कोणकोणत्या प्रकारचे असतात? १) श्वसन मास्क (Respirators)- श्वसन मास्क मध्ये तीन प्रकारचे मास्क येतात- 1) N९५, 2) N९९, ३) N१००  प्रमाणित असलेला N95 मास्क हवेतील ९५% कण ज्...

रेपो रेट (Repo rate) आणि रिवर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) म्हणजे काय?

RBI म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडिया हि भारतातील सर्व बँकाची प्रधान बँक आहे. RBI शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. RBI ची स्थापना हि १ एप्रिल १९३५ साली झाली. RBI च मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. संपूर्ण देशात चलन पुरवठा आणि चलन नियंत्रण करण्याच काम RBI करत असते. RBI ने घालून दिलेल्या नियमांनुसारच देशातील सर्व बँका कामकाज करत असतात. त्याचबरोबर काही दर (रेट) ठरवण्याच कामही रिजर्व बँक करत असते. पत्रकार परिषद घेऊन हे दर जाहीर केले जातात. यापैकीच दोन महत्वाचे रेट आहेत ते म्हणजे रेपो रेट आणि रिवर्स रेपो रेट.  रेपो रेट काय असतो? ज्याप्रमाणे सामान्य लोक बँकांमधून कर्ज काढतात. त्या कर्जावर बँक ठराविक व्याज लावत असते. त्याला आपण त्या बँकेचा व्याजदर म्हणतो. कर्जदाराला काढलेल्या कर्जासह या व्याजाचीही परतफेड करावी लागते. अशाच प्रकारे सर्व बँका या रिजर्व बँकेकडून कर्ज घेत असतात. रिजर्व बँकेकडून घेतलेल्या या कर्जावर रिजर्व बँक काही व्याजदर लावत असते. याच व्याजदराला रेपो रेट अस म्हणतात. जेव्हा रेपो रेट वाढतो त्यावेळी बँकासाठी RBI कडून कर्ज घेण आणखी महाग होत. त्यामुळेच बँकादेखील कर्जावरील ...