Skip to main content

Posts

Showing posts with the label Covid-19

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्...

हर्ड इमुनिटी (Herd Immunity) म्हणजे काय? हर्ड इमुनिटी चा वापर करून करोना वायरस थांबवला जाऊ शकतो का?

हर्ड इमुनिटी (Herd Immunity) हा शब्द वैदकीय क्षेत्रासाठी परिचित असला तरी सर्वसामान्य लोकांसाठी हा शब्द ऐकायला मिळाला तो करोना वायरस मूळच. जसा जसा करोना वायरस चीन पासून इतर देशात पसरला तसा तसा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपचार व लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास सर्वच देशांनी Lockdown, Quarantine, Social Distancing अश्या उपायांचा अवलंब केला. पण काही देश असे होते ज्यांनी Herd immunity with infection या वेगळ्या मार्गाचा अवलंब करायचं ठरवलं. त्यातले महत्वाचे दोन देश म्हणजे ब्रिटन आणि स्वीडन. ब्रिटनमध्ये यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तिथल्या सरकारने तो प्लान रद्द केला. पण स्वीडन हा देश Herd Immunity च्याच दिशेन चाललाय. स्वीडन मध्ये कधीच पूर्ण टाळेबंदी करण्यात आलेली नाही. Herd Immunity नक्की काय आहे?? Herd Immunity या शब्दाचा मराठी अर्थ “कळप प्रतिकारशक्ती” असा होतो. कोणत्याही वायरसच संक्रमण थांबवायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या शरीरामध्ये त्या वायरस विरोधात प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेचं असत. अश्या प्रकारे मोठ्या लोकसमूह मध्ये बनवलेल्या immunity लाच Herd...