Skip to main content

Posts

फेसबुक कडून भारतात इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels) लॉन्च.. काय आहे हे इंस्टाग्राम रील्स?

भारत-चीन सीमावाद च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५८ चीनी एप्स वर बंदी घातली होती. या ५८ एप्स मध्ये भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेलं टिकटॉक हेही एक एप होत. भारतात टिकटॉक वापरणाऱ्या लोकांची संख्या हि १० कोटी पेक्षा जास्त होती. टिकटॉक वर भारतात घातलेली हि बंदी एक सुवर्णसंधी समजून फेसबुक भारतात इंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामच एक नवीन फिचर सुरु करत आहे. ब्राझील, जर्मनी, फ्रांस नंतर भारत हा चौथा देश आहे जिथ हे इंस्टाग्रामच फिचर सुरु करण्यात आल आहे. इंस्टाग्राम रील्स हे स्वतंत्र ऐप नसून सध्या सुरु असलेल्या इंस्टाग्रामच्या ऐप मध्येच रील्स(Reels) हा पर्याय देण्यात आलेला आहे. काय आहे इंस्टाग्राम रील्स? इंस्टाग्राम रील्स हे टिकटॉक प्रमाणे विडीओ बनवण्यासाठी इंस्टाग्राम कडून सुरु करण्यात आलेलं एक फिचर आहे. यामध्ये युजर्स १५ सेकंदाचे विडीओ बनवू शकतात. टिकटॉक प्रमाणेच रील्स मध्येही इंस्टाग्राम मुजिक लायब्ररी उपलब्ध आहे ज्यामधून युजर्स वेगवेगळी गाणी, संगीत निवडून त्यावर विडीओ बनवू शकतात. तसेच स्पीड इफेक्ट्स आणि टायमरही दिलेला आहे. बूमरँग आणि इतर ऑप्शन प्रमाणेच रील्स हा ऑप्शन इंस्टाग्
Recent posts

रेपो रेट (Repo rate) आणि रिवर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) म्हणजे काय?

RBI म्हणजेच रिजर्व बँक ऑफ इंडिया हि भारतातील सर्व बँकाची प्रधान बँक आहे. RBI शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. RBI ची स्थापना हि १ एप्रिल १९३५ साली झाली. RBI च मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. संपूर्ण देशात चलन पुरवठा आणि चलन नियंत्रण करण्याच काम RBI करत असते. RBI ने घालून दिलेल्या नियमांनुसारच देशातील सर्व बँका कामकाज करत असतात. त्याचबरोबर काही दर (रेट) ठरवण्याच कामही रिजर्व बँक करत असते. पत्रकार परिषद घेऊन हे दर जाहीर केले जातात. यापैकीच दोन महत्वाचे रेट आहेत ते म्हणजे रेपो रेट आणि रिवर्स रेपो रेट.  रेपो रेट काय असतो? ज्याप्रमाणे सामान्य लोक बँकांमधून कर्ज काढतात. त्या कर्जावर बँक ठराविक व्याज लावत असते. त्याला आपण त्या बँकेचा व्याजदर म्हणतो. कर्जदाराला काढलेल्या कर्जासह या व्याजाचीही परतफेड करावी लागते. अशाच प्रकारे सर्व बँका या रिजर्व बँकेकडून कर्ज घेत असतात. रिजर्व बँकेकडून घेतलेल्या या कर्जावर रिजर्व बँक काही व्याजदर लावत असते. याच व्याजदराला रेपो रेट अस म्हणतात. जेव्हा रेपो रेट वाढतो त्यावेळी बँकासाठी RBI कडून कर्ज घेण आणखी महाग होत. त्यामुळेच बँकादेखील कर्जावरील आपली

करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क किती प्रभावी आहे??

करोना वायरसच्या आधीचं मानवी जीवन आणि नंतरच मानवी जीवन यात सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे चेहऱ्यावरच्या मास्कचा. जपान हा देश सोडला तर नेहमी चेहऱ्यावर मास्क घालून फिरणारे लोक इतरत्र कोणत्याही देशात दिसत नाहीत. जपान मध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरलात तर लोक विचित्र नजरेने पाहतात. मास्क हा तिथल्या संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. पण करोनाच्या प्रसारानंतर सर्वच देशांनी मास्क घालणे अनिवार्य केले आहे. भारतातही मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अश्या वेळी करोना वायरस पासून बचाव करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा आणि मास्क किती प्रभावी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे.                                            फोटो सौजन्य -  Juraj Verga मास्क कोणकोणत्या प्रकारचे असतात? १) श्वसन मास्क (Respirators)- श्वसन मास्क मध्ये तीन प्रकारचे मास्क येतात- 1) N९५, 2) N९९, ३) N१००  प्रमाणित असलेला N95 मास्क हवेतील ९५% कण ज्यांचा व्यास (diameter) १०० ते ३०० nanometer असतो फिल्टर करू शकतो. करोना विषाणूचा व्यास (diameter) हा १०० ते १५० nanome

हर्ड इमुनिटी (Herd Immunity) म्हणजे काय? हर्ड इमुनिटी चा वापर करून करोना वायरस थांबवला जाऊ शकतो का?

हर्ड इमुनिटी (Herd Immunity) हा शब्द वैदकीय क्षेत्रासाठी परिचित असला तरी सर्वसामान्य लोकांसाठी हा शब्द ऐकायला मिळाला तो करोना वायरस मूळच. जसा जसा करोना वायरस चीन पासून इतर देशात पसरला तसा तसा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपचार व लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास सर्वच देशांनी Lockdown, Quarantine, Social Distancing अश्या उपायांचा अवलंब केला. पण काही देश असे होते ज्यांनी Herd immunity with infection या वेगळ्या मार्गाचा अवलंब करायचं ठरवलं. त्यातले महत्वाचे दोन देश म्हणजे ब्रिटन आणि स्वीडन. ब्रिटनमध्ये यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर तिथल्या सरकारने तो प्लान रद्द केला. पण स्वीडन हा देश Herd Immunity च्याच दिशेन चाललाय. स्वीडन मध्ये कधीच पूर्ण टाळेबंदी करण्यात आलेली नाही. Herd Immunity नक्की काय आहे?? Herd Immunity या शब्दाचा मराठी अर्थ “कळप प्रतिकारशक्ती” असा होतो. कोणत्याही वायरसच संक्रमण थांबवायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या शरीरामध्ये त्या वायरस विरोधात प्रतिकारकशक्ती तयार होण गरजेचं असत. अश्या प्रकारे मोठ्या लोकसमूह मध्ये बनवलेल्या immunity लाच Herd